भाषा

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

चेन्नई, भारतातील गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ

चेन्नई, भारतातील गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ | 27+ वर्षांचा अनुभव
डॉ. एस. अरुमुगम – चेन्नई ऑर्थो

संधिवात (आर्थरायटिस), दुखापत किंवा वाढत्या वयासोबत सांध्याची होणारी झीज यांमुळे होणारी गुडघेदुखी हळूहळू चालण्या-फिरण्यावर, गुडघ्याच्या स्थिरतेवर आणि स्वावलंबनावर परिणाम करू शकते. सुरुवातीला अधूनमधून जाणवणारा त्रास पुढे हालचालींवर मर्यादा आणतो आणि रोजची कामेही अवघड होत जातात. चेन्नईत किंवा भारतात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा विचार करणाऱ्या रुग्णांसाठी योग्य शल्यचिकित्सक निवडणे हे सांध्याचे कार्य आणि दीर्घकाळ टिकणारी हालचाल परत मिळवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
अस्थिरोग क्षेत्रातील 27 वर्षांहून अधिक अनुभव असलेले डॉ. एस. अरुमुगम हे शस्त्रक्रियेचे अचूक नियोजन, प्रामाणिक उपचार सल्ला आणि सातत्याने मिळणारे चांगले परिणाम यांसाठी ओळखले जातात. 10,000 हून अधिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि 1,350+ रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया केलेले डॉ. अरुमुगम आपला सखोल अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार देतात.
प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी केली जाते — सांध्याची किती झीज झाली आहे, रुग्ण किती सक्रिय आहे, त्याच्या जीवनशैलीच्या गरजा काय आहेत आणि पुढे त्याला कशी हालचाल करायची आहे, हे सर्व समजून घेतले जाते. उपचार शस्त्रक्रियेशिवाय असो, अर्धवट (पार्शियल) गुडघा प्रत्यारोपण असो किंवा संपूर्ण (टोटल) गुडघा प्रत्यारोपण — प्रत्येक निर्णय ठरावीक पद्धतीने नव्हे, तर त्या रुग्णाच्या गरजेनुसार घेतला जातो.
आमचा भर फक्त शस्त्रक्रियेवर नसतो. काळजीपूर्वक नियोजन, आधुनिक तंत्र आणि ठरावीक पद्धतीने केलेले पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) — हे सर्व मिळून सांध्याला स्थिरता देतात, हालचाल सुधारतात आणि बरे होण्याचा प्रवास सुरळीत करतात. प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक काळजी घेऊन रुग्णांना पुन्हा आत्मविश्वासाने चालता-फिरता यावे आणि पुन्हा सक्रिय, स्वावलंबी आयुष्य जगता यावे, हेच आमचे ध्येय आहे.
“अचूकता, अनुभव आणि वैयक्तिक अस्थिरोग उपचारांतून पुन्हा मिळवा मोकळी हालचाल.”
about-doc

10,000+

सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

1,350+

रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया

20,000+

उपचार घेतलेले रुग्ण

3+

चेन्नईतील रुग्णालयांमध्ये सल्ला

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण तुमच्यासाठी योग्य आहे का?

तुम्हाला खालील त्रास होत असल्यास रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तुमच्यासाठी योग्य ठरू शकते:

सतत गुडघेदुखी आणि आखडलेपणा: औषधे आणि फिजिओथेरपी घेऊनही न जाणारा, चालणे, जिना चढणे किंवा उभे राहणे यांत अडथळा आणणारा दीर्घकाळचा त्रास.

वाढलेला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघ्याच्या सांध्याचे नुकसान: एक्स-रे/MRI मध्ये कूर्चेची (कार्टिलेज) मोठी झीज, सांध्याचा बदललेला आकार किंवा हाडाला हाड घासत असल्याचे दिसणे, ज्यामुळे हालचालीवर परिणाम होतो.

गुडघ्याची हालचाल आणि कार्य कमी होणे: गुडघा वाकवायला, सरळ करायला किंवा त्यावर भार द्यायला त्रास होणे, ज्यामुळे एकूण आयुष्याचा दर्जा खालावतो.

इतर उपचारांचा उपयोग न होणे: औषधे, इंजेक्शन किंवा फिजिओथेरपी यांसारख्या शस्त्रक्रियेशिवायच्या उपचारांनी आराम मिळत नसेल तर.

आयुष्याच्या दर्जावर परिणाम: वेदना आणि हालचाल न करता येणे यांमुळे तुमचे स्वावलंबन कमी होत असेल, तर कायमस्वरूपी आरामासाठी रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण हे योग्य पाऊल ठरू शकते.

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा विचार कधी करावा?

तुम्हाला खालीलपैकी काही त्रास होत असल्यास शस्त्रक्रियेचा विचार करण्याची वेळ आली असू शकते:

तीव्र गुडघेदुखी

रोजच्या कामांत अडथळा आणणारी, झोपमोड करणारी किंवा औषधे घेऊनही न थांबणारी वेदना.

गुडघा अस्थिर वाटणे

चालताना गुडघा अचानक लटपटतो किंवा वाकतो, त्यामुळे तोल जातो आणि पडण्याची भीती वाटते.

सांध्याची झीज

वाढलेल्या संधिवातामुळे (आर्थरायटिस) गुडघ्यातील कूर्चा (कार्टिलेज) आणि हाडांचे नुकसान.

गुडघ्याची हालचाल कमी होणे

गुडघा आखडल्यामुळे वाकणे, चालणे किंवा जिना चढणे अवघड होणे.

पायांचा आकार वाढत्या प्रमाणात बदलणे

पाय धनुष्यासारखे बाहेर वाकणे (बो-लेग्स) किंवा गुडघे आत एकमेकांना टेकणे (नॉक-नी) — आणि हा बदल काळानुसार वाढत जाणे.

VELYS रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली

आधुनिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा मिळवा मोकळी हालचाल — चेन्नई ऑर्थोमध्ये

संधिवातामुळे (आर्थरायटिस) किंवा सांध्याच्या दीर्घकाळच्या झिजेमुळे होणारी गुडघेदुखी हळूहळू चालणे-फिरणे, स्वावलंबन आणि रोजचे आरामदायी आयुष्य यांवर परिणाम करू शकते. शस्त्रक्रियेशिवायचे उपचार उपयोगी ठरेनासे झाले की वेदना कमी करण्यासाठी आणि हालचाल परत मिळवण्यासाठी गुडघा प्रत्यारोपण हा महत्त्वाचा पर्याय ठरतो.

चेन्नई ऑर्थोमध्ये गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रत्येक...

अत्याधुनिक उपचार

अत्याधुनिक उपचार

उच्च दर्जाची आरोग्यसेवा

उच्च दर्जाची आरोग्यसेवा

उत्कृष्ट शस्त्रक्रिया कौशल्य

उत्कृष्ट शस्त्रक्रिया कौशल्य

वैद्यकीय नवोपक्रम

वैद्यकीय नवोपक्रम

गुडघा प्रत्यारोपण प्रक्रिया

1

सल्ला व तपासणी

प्रक्रियेची सुरुवात सविस्तर सल्ल्याने होते — गुडघ्याचा त्रास, हालचालींवरील मर्यादा, आधी घेतलेले उपचार आणि तुमच्या जीवनशैलीच्या अपेक्षा समजून घेतल्या जातात. शारीरिक तपासणी आणि एक्स-रे/स्कॅन यांच्या मदतीने सांध्याचे किती नुकसान झाले...

2

शस्त्रक्रियेची तयारी

शस्त्रक्रिया ठरल्यानंतर रुग्णांना आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधांमध्ये करायचे बदल, आहाराची तयारी आणि शस्त्रक्रियेपूर्वीचे व्यायाम याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाते. शस्त्रक्रियेपूर्वी एकूण आरोग्य उत्तम ठेवल्याने शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते, बरे होण्यास...

3

शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियेदरम्यान खराब झालेली कूर्चा (कार्टिलेज) आणि झिजलेले सांध्याचे पृष्ठभाग काळजीपूर्वक काढून त्याजागी खास इम्प्लांट बसवले जातात. संधिवात किती पसरला आहे यानुसार संपूर्ण (टोटल) किंवा अर्धवट (पार्शियल) गुडघा प्रत्यारोपण केले जाते....

4

बरे होणे व पुनर्वसन

शस्त्रक्रियेनंतर लगेचच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उठणे-चालणे आणि फिजिओथेरपी सुरू होते. शस्त्रक्रियेनंतरचा वैयक्तिक पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) कार्यक्रम स्नायूंची ताकद, लवचिकता, तोल आणि चालण्याचा आत्मविश्वास परत मिळवण्यावर भर देतो. नियमितपणे केलेले पुनर्वसन गुडघ्याचे कार्य...

5

फॉलो-अप तपासणी

नियमित फॉलो-अप भेटींमुळे बरे होण्याच्या संपूर्ण काळात प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवता येते. सांध्याचे कार्य, इम्प्लांटची स्थिती, हालचाल आणि पुनर्वसनातील प्रगती तपासली जाते, जेणेकरून बरे होण्याची प्रक्रिया योग्य मार्गावर राहील. सततच्या...

6

हालचाल हेच जीवन

दीर्घकाळ निरोगी सांधे आणि स्वावलंबी आयुष्यासाठी हालचाल चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. अरुमुगम मानतात. प्रत्येक उपचाराचा सल्ला याच तत्त्वावर आधारित असतो — मग तो शस्त्रक्रियेशिवाय अधिक वाचा

पहिले पाऊल उचला — वेदनामुक्त आयुष्यासाठी

संधिवात, खेळातील दुखापती किंवा वयामुळे होणारी झीज यांमुळे मागे राहू नका. शस्त्रक्रिया असो वा शस्त्रक्रियेशिवाय उपचार, छोट्या छेदाची शस्त्रक्रिया असो वा भारतातील आधुनिक सांधे प्रत्यारोपण — आत्मविश्वासाने बरे होण्यासाठी डॉ. अरुमुगम आणि त्यांची टीम तुम्हाला मार्गदर्शन करण्यास तयार आहे.

प्रशांत हॉस्पिटल logo

परिसर: वेलचेरी

भेटीचे दिवस: सोमवार – शनिवार

भेटीची वेळ: सकाळी 10:30 – दुपारी 1:30

तुमची अपॉइंटमेंट बुक करा

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे प्रकार

रोबोटिक-असिस्टेड गुडघा प्रत्यारोपण

VELYS रोबोटिक सिस्टीमच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आधुनिक तंत्रामुळे प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्यानुस...

संपूर्ण (टोटल) गुडघा प्रत्यारोपण

या शस्त्रक्रियेत मांडीचे हाड आणि नडगीचे हाड या दोन्हींचे सांध्याचे पृष्ठभाग उच्च दर्जाच्या इम्प्लांट...

अर्धवट (पार्शियल) गुडघा प्रत्यारोपण (युनिकंपार्टमेंटल)

यात गुडघ्याचा फक्त खराब झालेला भाग बदलला जातो आणि निरोगी हाड, कूर्चा (कार्टिलेज) व लिगामेंट जसेच्या ...

दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण (बायलॅटरल)

एकाच वेळी रुग्णालयात दाखल असताना दोन्ही गुडघे बदलले जातात, त्यामुळे एकूण विश्रांतीचा काळ कमी होतो. द...

रिव्हिजन गुडघा प्रत्यारोपण

निकामी झालेले किंवा झिजलेले जुने इम्प्लांट दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी केली जाणारी विशेष शस...

कमी छेदाचे (मिनिमली इन्व्हेसिव्ह) गुडघा प्रत्यारोपण

छोट्या छेदातून, आजूबाजूच्या ऊतींना कमीत कमी धक्का लावून केली जाणारी शस्त्रक्रिया. यामुळे व्रण कमी रा...

आत्मविश्वास निवडा,
चेन्नई ऑर्थो निवडा

डॉ. अरुमुगम जागतिक दर्जाचे शस्त्रक्रिया कौशल्य आणि मनापासूनची आपुलकी यांची सांगड घालतात, त्यामुळे तुम्ही नेहमी सुरक्षित हातांत असता. इथे हजारो रुग्णांनी पुन्हा हालचाल आणि आत्मविश्वास मिळवला आहे — त्यांना फक्त एक 'केस' म्हणून नव्हे, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवले गेले. डॉ. अरुमुगम यांच्या मदतीने पुन्हा एकदा मोकळ्या हालचालीच्या, आरामाच्या आणि नव्या शक्यतांच्या आयुष्यात पाऊल टाका.

Video Testimonial 1

डॉ. सिलेंद्र बाबू

पोलीस अधीक्षक

Video Testimonial 2

श्री. कन्नन शंकरनबडी

धावपटू

Video Testimonial 3

प्राजक्ता

धावपटू, ट्रायथलीट आणि उत्साही ट्रेकर

Video Testimonial 4

वेंकटरामन राजगोपालन

खलाशी (मरीनर)

Video Testimonial 5

गणेश

उद्योजक

रुग्णांचा विश्वास का आहे डॉ. एस. अरुमुगम यांच्यावर

अस्थिरोग क्षेत्रातील 27+ वर्षांचा अनुभव

दोन दशकांहून अधिक काळ सांधे वाचवणे, सांधे प्रत्यारोपण आणि गुडघ्याच्या गुंतागुंतीच्या आजारांवर समर्पित सेवा — अचूक वैद्यकीय निर्णयक्षमता आणि शस्त्रक्रियेतील नेमकेपणाच्या आधारे.

20,000+ रुग्णांवर उपचार

भारतभरातून आणि परदेशातून आलेल्या हजारो रुग्णांना वैयक्तिक उपचार योजना, पारदर्शक संवाद आणि दीर्घकालीन अस्थिरोग काळजी यांचा लाभ मिळाला आहे.

10,000+ सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा सखोल अनुभव — अचूकता, सुरक्षितता आणि दीर्घकाळ टिकणारी चांगली हालचाल यांवर विशेष भर.

1,350+ रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया

रोबोटिक-असिस्टेड गुडघा प्रत्यारोपणातील प्रगत कौशल्य — यामुळे गुडघ्याची अचूक रेषा (अलाइनमेंट), वैयक्तिक नियोजन आणि इम्प्लांट अधिक योग्य जागी बसवणे शक्य होते.

अस्थिरोग शल्यचिकित्सकांचे मार्गदर्शक व प्रशिक्षक

शल्यचिकित्सकांसाठीचे शिक्षण कार्यक्रम, रोबोटिक शस्त्रक्रिया प्रशिक्षण उपक्रम आणि भारतातील व आंतरराष्ट्रीय अस्थिरोग परिषदांमध्ये सक्रिय सहभाग.

रुग्णकेंद्रित उपचार दृष्टिकोन

प्रत्येक उपचार योजना रुग्णाची लक्षणे, अपेक्षा, सक्रियता आणि दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन तयार केली जाते. शस्त्रक्रियेचा सल्ला फक्त तेव्हाच दिला जातो, जेव्हा त्यातून रुग्णाला खरा फायदा होणार असेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

हो. योग्य तपासणीनंतर निवडलेल्या रुग्णांमध्ये एकाच वेळी रुग्णालयात दाखल असताना दोन्ही गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता येते. हे रुग्णाचे एकूण आरोग्य, वय आणि वैद्यकीय तपासणी यांवर अवलंबून असते.

Treatment Background

पहिले पाऊल उचला — वेदनामुक्त आयुष्यासाठी

तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल आणि तुम्ही गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा विचार करत असाल, तर चेन्नई ऑर्थोमध्ये डॉ. अरुमुगम यांची भेट घेण्यासाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा. चांगल्या हालचालीसाठी आणि वेदनामुक्त आयुष्यासाठी प्रत्येक पावलावर तुम्हाला मार्गदर्शन आणि साथ देण्यासाठी आमची आपुलकीची टीम...